भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत, देश प्रगतीपथावर; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खोडला राहुल गांधींचा दावा

Foto
नवी दिल्ली : भारत एका आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे. भारतात प्रचंड बेरोजगारी आहे, उत्पादन क्षेत्र कोलमडले आहे आणि शिक्षण क्षेत्रात असंख्य समस्या आहेत. मंगळवारी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी हे भाष्य केलं होतं. मात्र फिक्कीच्या परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींचा हा दावा खोडून काढला आहे. भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत स्थितीत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत स्थितीत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिक्कीच्या परिषदेत म्हटलं आहे. भारत आज ज्या स्तरावर वाटचाल करतो आहे तो मार्ग योग्य आहे. त्या मार्गात देशाच्या यशाची गॅरंटी आहे. आज भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. मोठमोठ्या संस्थांचं अनुमान आहे की भारत सरासरी ७ टक्क्यांच्या ग्रोथ रेटने प्रगती करेल. ऑक्टोबर महिन्यात एक गोष्ट लक्षवेधी ठरली. या महिन्यात भारताचा गुड्स एक्स्पोर्ट ५० बिलियन डॉलर्स इतका झाला आहे. हा भारताचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा एक्स्पोर्ट आहे.

जगाने आपल्या देशाच्या प्रगतीची दखल घेतली आहे-मोदी
भारताचा परफॉर्मन्स असा आहे की मूडीज रेटिंग्ज, फिच रेटिंग, वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक हे सगळे आपल्या प्रगतीचं कौतुक करत आहेत. आपल्या शास्त्रांनी हजारो वर्षांपूर्वी एक महत्त्वाचा संदेश आपल्याला दिला आहे. आपल्या क्षमता ओळखून आपल्याला प्रगती करायची आहे. आपल्या कमतरांमधून शिकायचं आहे आणि आहोत त्यापेक्षा अधिक चांगलं व्हायचं हा प्रयत्न करायचा आहे. पुढे जायचं असेल तर वेळच्या वेळी आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. ही बाब फक्त व्यक्तींवर नाही तर संस्था, आस्थपना आणि देश सगळ्यांनाच लागू होते. फिक्कीने त्यांच्या १०० वर्षांच्या कालखंडात देशाच्या व्यवयसाय जगतातील प्रगतीचे आलेख पाहिले आहेत. आता भारतीय उद्योग जगत पुढच्या २० वर्षांत काय प्रगती करतो ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. विकसित भारताच्या यात्रेत आत्मनिर्भर भारताच्या यात्रेत तुम्ही तुमचं योगदान कसं वाढवता याला महत्व आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

आज मला तुम्हाला हाच आग्रह आहे की पुढच्या २० वर्षांच्या गुंतवणुकीचा विचार करताना इंडिया फर्स्टचा मंत्र लक्षात ठेवा. यामुळे देश आत्मनिर्भर होणार आहे आणि तुम्हाला नव्या व्यवसाय संधी लाभतील हे विसरू नका. जरा विचार करा १०० वर्षे झाली, १९३० मध्ये महात्मा गांधींनीही स्वदेशीचा नारा दिला होता, मलाही हेच सांगावं लागतं आहे. माझं ऐकायचं नसेल तर नका ऐकू महात्मा गांधींचं ऐकायचं होतं. मी तुम्हाला फार्मा इंडस्ट्रीचं उदाहरण देतो. भारताला जगभरात फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हटलं जातं. पण भारताला दरवर्षी , बल्क ड्रग्ज, ड्रग्ज इंटर मिडियेट्स यांची कोट्यवधींची आयात करतो. अनेक गोष्टींसाठी फार्मा इंडस्ट्री आयातीवर अवलंबून आहे. आता फार्मा इंडस्ट्रीला हा विचार करावा लागेल की कुठल्या गोष्टी आपण भरतात तयर करु शकतो ? असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.